E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
शिव वर्मा यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
Wrutuja pandharpure
20 Jun 2025
गाऊ त्यांना आरती , गिरीश चिटणीस
स्वातंत्र्यलढ्यात शिव वर्मा या स्वातंत्र्ययोद्ध्याचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. शिव वर्मा हे एक क्रांतिकारक, विचारवंत आणि साहित्यिक होते. भारतीय क्रांतिकारक परंपरेतील धैर्यशील, तत्त्वनिष्ठ आणि वैचारिक बलशाली व्यक्तिमत्त्व म्हणून आजही त्यांचे आदराने स्मरण केले जाते. लाहोर कट खटल्यातील माहिती देणारे साक्षीदार होते. त्यांचे जीवन म्हणजे विचारांची प्रामाणिकता, त्यागाची ठाम वृत्ती आणि क्रांतीच्या स्वप्नांसाठी अखंड समर्पण होय.
लाहोर कटाचा निकाल ७ ऑक्टोबर १९३० रोजी लागला. त्यातील शिव वर्मा हे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या क्रांतिकारकांपैकी एक होते. १३ मे १९२९ रोजी शिव वर्मा यांना डॉ. गया प्रसाद आणि जयदेव कपूर यांच्यासह सहारनपुर बॉम्ब कारखान्यात अटक झाली. सहायक पोलिस अधीक्षक जेम्स सॉन्डर्सच्या खुनाचा कट केल्याच्या आरोपावरून तसेच मध्यवर्ती कायदेमंडळात बॉम्ब फेकण्याच्या कटात सहभागी असल्याबद्दल धरपकड करण्यात आली. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त हे मध्यवर्ती कायदे मंडळात बॉम्ब फेकला, तेव्हाच पकडले गेले होते. त्यानंतर सुखदेव, राजगुरू, जितेंद्र संन्याल, अजयकुमार घोष वगैरे अनेक जणांना पकडण्यात आले. चंद्रशेखर आझाद आणि यशपाल सापडले नाहीत. त्यांना फरारी म्हणून जाहीर करण्यात आले. पकडलेल्या क्रांतिकारकांत जतींद्रनाथ दास हेही होते. या सर्व आरोपींना लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले. सॉन्डर्स खून खटला किंवा लाहोर कट खटला म्हणून हा खटला गाजला.
जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर शिव वर्मा यांना आंध्र प्रदेशातील राजमुद्री जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले. कारागृहात पाठविण्यापूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना विनंती करून भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरु यांची शेवटची भेट घेतली. निघताना शिव वर्मा यांचे डोळे अश्रूंनी भरले. तेव्हा भगतसिंग म्हणाले, ‘शिव, भावनिक होण्याची ही वेळ नाही. काही दिवसांत मी सर्व अडचणींपासून मुक्त होईन; परंतु तुम्हा सर्वांना कठीण प्रवास करावा लागेल. मला खात्री आहे, की जबाबदारीचे मोठे ओझे असूनही, तुम्ही या दीर्घ मोहिमेत थकणार नाही आणि तुम्ही हार मानण्याइतके निराश होणार नाही.’
राजमुंद्री जिल्हा कारागृहात शिव वर्मा यांना प्रथम चंद्रशेखर आझाद आणि नंतर भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. नंतर त्यांना अंदमान बेटावर काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आले.कैद्यांना, विशेषतः राजकीय कैद्यांना दिल्या जाणार्या अमानुष आणि अन्याय्य वागणुकीच्या निषेधार्थ शिव वर्मा यांनी उपोषणात भाग घेतला. या उपोषणादरम्यान त्यांचे ’हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेना’ या संघटनेचे सहकारी महावीर सिंग यांचे निधन झाले. ब्रिटिश अधिकार्यांनी अखेर स्वातंत्र्ययोद्ध्यांची माफी मागितली, त्यांच्या मागण्या मान्य केल्या. राजकीय कैद्यांसाठी पुस्तके व अभ्यास करण्यासाठी परवानगी व एकमेकांशी संवाद साधण्याची परवानगी दिली. हळूहळू तुरुंगाच्या आवारात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. कैद्यांनी सतीश पाक्राशी, शिव वर्मा आणि भूपाळ बोस यांच्याकडून राज्यशास्त्र आणि इतिहासाचा अभ्यास शिकून घेतला. १९३७ मध्ये शिव वर्मा आणि हरे कृष्ण कोनार यांच्या नेतृत्वाखाली अंदमान तुरुंगातील काळ्या पाण्याची शिक्षा रद्द होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी ३६ दिवसांचे पुन्हा उपोषण केले. शिव वर्मा यांची १९४६ मध्ये कैदेतून सुटका करण्यात आली.
निवडणुकीत पराभव
जवळपास १६ वर्षे त्यांनी तुरुंगामध्ये हालअपेष्टा सहन केल्या. कैदेतून सुटका झाल्यानंतर शिव वर्मा भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. १९४८ मध्ये शिव वर्मा यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उत्तर प्रदेश राज्य समितीचे सचिव म्हणून निवड झाली. शिव वर्मा हे सीपीआय (एम) यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. १९७१ मध्ये शिव वर्मा यांना कानपूरमधून सीपीआय (एम) चे लोकसभेचे तिकीट मिळाले; परंतु त्यांना त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआय समर्थित स्वतंत्र कम्युनिस्ट उमेदवार एस. एम. बॅनर्जी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. शिव वर्मा यांनी भारतीय क्रांतिकारकांचे तथ्यात्मक चित्रण करण्याचा आणि त्यांच्याबद्दलच्या ध्रुवीकृत मतांना विरोध करण्याचा सतत प्रयत्न केला. ते तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ’लोकलाहर’ आणि ’नया सवेरा’चे संपादक होते. ’नया पथ’ या हिंदी मासिकाचेही संपादक होते. त्यांनी लखनौ येथील हुतात्मा स्मारक आणि स्वातंत्र्य संघर्ष संशोधन केंद्राची स्थापनादेखील केली. विशेषतः शिव वर्मा यांनी इतिहासात नोंद होण्याइतके क्रांतिकारकांवरील लेख, छायाचित्रे इत्यादी गोळा करण्यासाठी देशभर प्रवास करून सर्वांच्या कागदपत्रांचे डॉक्युमेंटेशन केले. लंडनमधील संग्रहालयास भेट देऊन माहिती संकलित केली.
दीर्घकाळ तुरुंगवासातील कष्टमय जीवन व्यतीत करूनही मिळालेले आयुष्य त्यांनी आपल्या सहकार्यांचे योगदान समाजापुढे आणले. हरदोई नगरपरिषदेने भारतीय क्रांतिकारकांचे देशासाठी समर्पित योगदान असलेल्या शिव वर्मा, जयदेव कपूर आणि हरी बहाद्दूर श्रीवास्तव यांचे पुतळ्यासह स्मारक उद्यानामध्ये उभे केले आहे.
असहकार चळवळीत भाग
शिव वर्मा यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९०४ रोजी संयुक्त प्रांतातील हरदोई जिल्ह्यातील खाटेली गावात झाला. वयाच्या १७ व्या वर्षीच स्वातंत्र्याने प्रेरित होऊन त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. तेव्हा ते डीएव्ही कॉलेजचे विद्यार्थी होते. कानपूर हे ते ठिकाण होते, जिथे शचींद्रनाथ संन्याल, सुरेशचंद्र भट्टाचार्य, योगेशचंद्र चटर्जी आणि इतरांनी ’हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ची स्थापना केली. बिजॉयकुमार सिन्हा, शिव वर्मा, जयदेव कपूर आणि सुरेंद्रनाथ पांडे आणि इतर जे ’प्रभात’ पक्षाचे सदस्य होते, जे त्यांनी ’हिंदुस्थान रिपब्लिकन’ पक्षामध्ये आपले कार्य चालू केले. शिव वर्मा हे समाजवादाकडे झुकले होते. बिजॉयकुमार सिन्हा यांनी शिव वर्मा यांची ओळख पत्रकार आणि लेखक राधा मोहन गोकुळ यांच्याशी करून दिली. ते शिव वर्मा यांचे वैचारिक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले. १९२५ मध्ये काकोरी रेल्वे दरोडा घटनेनंतर चंद्रशेखर आझाद झाशी येथे एकांतवासात राहात होते. याचवेळी शिव वर्मा यांची त्यांच्याशी भेट झाली. कानपूर येथील डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत असताना शिव वर्मा १९२७ मध्ये भगतसिंग यांना
पहिल्यांदा भेटले.
काकोरीच्या प्रकरणानंतर क्रांतिकारक पक्षाच्या उर्वरीत जुन्या पुढार्यांच्या अंत:करणात निराशा व कंपनाची लाट उसळली. आपले वजन टिकविण्यासाठी ते आपल्या तरुण अनुयायांसमोर गूढवादी परिभाषा वापरीत; पण प्रत्यक्षात काही करीत नसत. त्यांच्या या अकर्मण्यतेचा वीट येऊन सरदार भगतसिंह, सुखदेव, शिव वर्मा इत्यादी तरुण क्रांतिकारक नेत्यांनी स्वतंत्रपणे उत्तर भारत व बंगाल प्रांतातील क्रांतिकारक समित्यांची भेट घेऊन सर्वांचीच एक संयुक्त सभा ८ व ९ सप्टेंबर १९२८ रोजी दिल्लीला ’फिरोजशहा किल्ल्या’च्या एकांतपूर्ण अवशेषाच्या विभागात घेतली. बैठकीला पंजाबमधून सरदार भगतसिंग व सुखदेव, राजस्तानमधून कुंदनलाल, संयुक्त प्रांतातून शिव वर्मा, ब्रह्मदत मिश्र, जयदेव, विजयकुमार सिंह, सुरेंद्रनाथ पांडे आणि बिहारमधून मणींद्रनाथ घोष आणि मनमोहन बॅनर्जी हे प्रतिनिधी उपस्थित होते. चंद्रशेखर आझाद यांच्या संमतीने ‘हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेना’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान ’न भूतो न भविष्यती’ असे आहे.
भगतसिंग यांनी या संघटनेबद्दल असे म्हटले आहे की,.... दहशतवाद हा एक टप्पा आहे. क्रांतिकार्यात हे एक आवश्यक व अपरिहार्य असे पाऊल आहे. दहशतवाद म्हणजे पूर्ण क्रांती नव्हे; पण दहशतवादाशिवाय क्रांती पूर्ण होत नाही. दहशतवादामुळे राज्यकर्त्यांच्या मनमानीला धक्का बसतो. देशाच्या स्वातंत्र्यतृष्णेचा दहशतवाद हा परिणामकारक पुरावा आहे. पूर्वीच्या काळातील इतर देशांप्रमाणेच भारतातही दहशतवादाचे क्रांतीत व या क्रांतीचे सामाजिक, राजकीय व आर्थिक स्वातंत्र्यात रूपांतर होईल. या संघटनेचे प्रमुख असलेल्या शिव वर्मा यांनी ’चाँद’ या वृत्तपत्रांसाठी अनेक लेख लिहून युवकांना या संघटनेत सामील करून घेतले. सायमन यांच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या कमिटीच्या निषेधार्थ भारतात ठिकठिकाणी हरताळ पाळण्यात आला आणि ’सायमन गो बॅक’ यासाठी आंदोलने करण्यात आली. लाहोर येथे निघालेल्या मिरवणुकीचे नेतृत्व करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलीस सुपरिटेंडन्ट स्कॉट व सॉन्डर्स यांनी त्यांना मारहाण केली. तलवारीच्या मारामुळे थोड्याच दिवसांनी लालाजींचे निधन झाले. परिणामी लालाजींच्या अघोरी मृत्यूचा बदला घेण्यासाठी १७ डिसेंबर १९२८ म्हणजे लालाजींच्या पहिल्या मासिक दिनी भगतसिंग व राजगुरू यांनी साँडर्स यांना गोळ्या मारून त्यांना ठार केले.
त्यानंतर ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’च्या भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदे मंडळात बॉम्ब फेकले आणि देश हादरला. ब्रिटिशांचे धाबे दणाणले. त्यांनी या संघटनेच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. गया प्रसाद, जयदेव कपूर आणि शिव वर्मा यांनी सहानपूरमध्ये बॉम्ब कारखाना उभारण्याचे काम चालू केले होते. १३ मे १९२९ रोजी शिव वर्मा गाढ झोपेत होते, तेव्हा दार वाजले. फणींद्रनाथ घोष या पूर्वी क्रांतिकार्य केलेल्या परंतु लग्नानंतर त्याला पकडल्यानंतर माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पोलीस बॉम्ब फॅक्टरीपर्यंत पोहोचले. शिव वर्मा यांना कानपुरहून डॉ. गया प्रसादच पैसे घेऊन आले असे वाटल्याने, पिस्तुल तसेच खाटेवरील उशीखाली ठेवून असावध स्थितीत त्यांनी दार उघडले. पाहतात तर पोलीस. शिव वर्मा आणि जयदेव कपूर यांना अटक करण्यात आली, तसेच पुढे तीन दिवसांनी गया प्रसाद यांना काहीही माहिती नसल्याने ते सहानपूरमध्ये घरी आल्यावर त्यांनाही अटक करण्यात आली.
राजकीय कैद्यांना सवलती
शिव वर्मा, जयदेव कपूर, किशोरी लाल आणि इतर सर्व हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेनेच्या क्रांत्तिकारकांनी १३ जुलै १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्याशी एकता व्यक्त करण्यासाठी त्यांच्याबरोबर उपोषण सुरू केले. या काळात भगतसिंग, शिवराम राजगुरु, सुखदेव थापर आणि इतर बळकट पुरुषांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. १३ सप्टेंबर १९२९ रोजी जतींद्रनाथ दास यांनी ६३ दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचे बंधू किरणचंद्र यांच्या मांडीवर प्राण सोडला. या सर्व घटनांमध्ये शिव वर्मा आघाडीवर होते. जतींद्रनाथ यांच्या मृत्यूनंतर तुरुंग समितीने राजकीय कैद्यांना खास सवलती देण्याबाबत इंग्रज सरकारकडे काही शिफारसी केल्या. फेब्रुवारी १९३० मध्ये या क्रांतिकारक देशभक्तांना पुन्हा दोन आठवडे उपोषण करावे लागले.अंदमान तुरुंगातही शिव वर्मा यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबून सर्वांना न्याय मिळवून दिला. स्वातंत्र्यलढ्यातील शिव वर्मा यांचे योगदान स्वातंत्र्यलढ्यातील सर्वांनाच प्रेरणादायी ठरले.
Related
Articles
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
स्मृती मानधनाचे शानदार शतक
29 Jun 2025
पाकिस्तानात २४६ भारतीय कैदी
03 Jul 2025
राज्यात कमी पटसंख्या असूनही शाळा सुरुच : एकनाथ शिंदे
03 Jul 2025
कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीचे नवे नियम
27 Jun 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
स्मृती मानधनाचे शानदार शतक
29 Jun 2025
पाकिस्तानात २४६ भारतीय कैदी
03 Jul 2025
राज्यात कमी पटसंख्या असूनही शाळा सुरुच : एकनाथ शिंदे
03 Jul 2025
कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीचे नवे नियम
27 Jun 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
स्मृती मानधनाचे शानदार शतक
29 Jun 2025
पाकिस्तानात २४६ भारतीय कैदी
03 Jul 2025
राज्यात कमी पटसंख्या असूनही शाळा सुरुच : एकनाथ शिंदे
03 Jul 2025
कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीचे नवे नियम
27 Jun 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
स्मृती मानधनाचे शानदार शतक
29 Jun 2025
पाकिस्तानात २४६ भारतीय कैदी
03 Jul 2025
राज्यात कमी पटसंख्या असूनही शाळा सुरुच : एकनाथ शिंदे
03 Jul 2025
कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीचे नवे नियम
27 Jun 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप