चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव   

वृत्तवेध 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उच्च आयात शुल्कावरून चीनसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धात काही प्रमाणात नरमी आली असली, तरी अमेरिकेच्या शुल्कामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढू लागला आहे. मे महिन्यात अमेरिकेच्या शुल्कामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. हा शी जिनपिंग यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.मे महिन्यात चीनच्या उत्पादन प्रक्रियेत घट झाली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याचे सर्व प्रयत्न करूनही, ड्रॅगनला यश येत नाही. उत्पादन ‘पीएमआय’ घसरला आहे. मे २०२५ मध्ये चीनच्या उत्पादन क्षेत्रांबाबत केलेल्या एका खासगी सर्वेक्षणात समोर आलेले आकडे चीनसाठी धक्कादायक ठरणार आहेत. कारण उत्पादन ‘पीएमआय’ सप्टेंबर २०२२ नंतरच्या सर्वांत कमी पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेसोबत सुरू असलेले व्यापार युद्ध (अमेरिका-चीन व्यापार युद्ध) जवळजवळ संपुष्टात येत असतानाही, शुल्काचा मोठा परिणाम झाला आहे.
 
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्त दिले आहे की कैक्सिन मीडिया कंपनी आणि एस अँड पी ग्लोबल यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्पादन ‘पीएमआय’ एप्रिलमधील ५०.४ वरून मे महिन्यात ४८.३ वर घसरला. अधिकृत ‘पीएमआय’ डेटा दर्शवतो की चीनच्या उत्पादनात घटीचा हा सलग दुसरा महिना आहे. ‘कैक्सिन/एस अँड पी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ने जाहीर केलेला नवीनतम आकडा रॉयटर्सच्या सरासरी ५०.६ या अंदाजापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर तो पहिल्यांदाच ५० च्या खाली आला आहे. अहवालात एका सर्वेक्षणाचा हवाला देऊन म्हटले आहे की चीनमधील नोकरी बाजारातील परिस्थिती निराशाजनक राहिली आहे आणि सलग दुसर्‍या महिन्यात रोजगारात घट झाली आहे. जानेवारीनंतर मे महिन्यात ती सर्वांत वेगाने घसरली आहे. ‘कैक्सिन’च्या मते मे महिन्यात परदेशी मागणीत घट झाली. नवीन निर्यात ऑर्डरसाठीचा गेज जुलै २०२३ नंतरच्या नीचांकी पातळीवर आला. विक्रीत घट आणि निर्यातीत विलंब आणि देशातील देशांतर्गत आर्थिक संकटामुळे चिनी कारखान्यांनी तयार वस्तूंचा साठा जमा केला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Related Articles