E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात मुसळधार पावसाने मुठा नदी ओसंडून वाहू लागली
Samruddhi Dhayagude
19 Jun 2025
भिडे पूल पाण्याखाली, खडकवासल्यातून विसर्ग सुरु
पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाची हजेरी कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, खडकवासला धरण क्षेत्र परिसर, सिंहगड रोड, धायरी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव या उपनगरात पाणी साचल्याचे आढळले. काही भागात घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे. अनावश्यक प्रवास व नदीकाठी फिरणे टाळावे. कृपया नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ दुसरीकडे न्यावी.
कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे महापालिकेकडून सांगण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
भिडे पूल पाण्याखाली
दरवर्षीं जूननंतर पाण्याखाली जाणारा भिडे पूल यंदा लवकरच पाण्याखाली गेला आहे. संततधार पावसाने खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली. खबरदारी म्हणून महापलिकेने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे मुठा नदी ओसंडून वाहू लागली. यामुळे आता भिडे पूल पाण्याखाली गेल्याचे दिसते. भिडे पुलावरून सध्या वाहतूक बंद असल्याने काळजी करण्याचे कारण नाही.
यंदा धरणे लवकर भरणार
खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या परिरसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाले. त्यामुळे धरणे लवकरच भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मिटेल, असा अंदाज आहे.
Related
Articles
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
जगन्नाथ यात्रा गुंडीच्या मंदिरात
29 Jun 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
जम्मू-काश्मीरमधील तीन हॉटेल्सवर ईडीची कारवाई
29 Jun 2025
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
जगन्नाथ यात्रा गुंडीच्या मंदिरात
29 Jun 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
जम्मू-काश्मीरमधील तीन हॉटेल्सवर ईडीची कारवाई
29 Jun 2025
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
जगन्नाथ यात्रा गुंडीच्या मंदिरात
29 Jun 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
जम्मू-काश्मीरमधील तीन हॉटेल्सवर ईडीची कारवाई
29 Jun 2025
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
जगन्नाथ यात्रा गुंडीच्या मंदिरात
29 Jun 2025
पाकिस्तान पुन्हा उभारत दहशतवादी तळ
30 Jun 2025
संंसदेची सुरक्षा भेदणार्या दोघांना जामीन
02 Jul 2025
जम्मू-काश्मीरमधील तीन हॉटेल्सवर ईडीची कारवाई
29 Jun 2025
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
केरळचा आदर्श
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप