पाकिस्तानात रेल्वे रुळावर स्फोट   

जाफर एक्सप्रेसचे सहा डबे घसरले

पेशावर/ इस्लामाबाद : पाकिस्तानात एका रेल्वे रुळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे, पेशावरहून क्वेटाला निघालेल्या जाफर एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले. बलुचिस्तानच्या सिंध प्रांतातील जाकोबाबाद जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.  जाकोबाबादमधील एका जनावरांच्या बाजाराजवळील रेल्वे रुळाजवळ हा स्फोट झाला. स्फोटानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. 
 
या घटनेचे कारण आणि स्फोटाचे स्वरूप पोलिस तपासत आहेत. स्फोटानंतर, या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. स्फोटानंतर तीन फूट खोल खड्डा पडला. तसेच, सहा फुटापर्यंत रुळ पूर्णपणे उखडला होता. मार्चमध्ये क्वेटाहून पेशावरकडे निघालेल्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला करत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने रेल्वेचे अपहरण केले होते. 
 

Related Articles