कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश   

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का

मुंबइ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे चिरंजीव व काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार गोरे आदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे मागील काही दिवसांपासून पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. 

Related Articles