पहिलीपासून हिंदी भाषेचा निर्णय रद्द करा; अन्यथा आंदोलन   

साहित्य महामंडळासह लेखक, वाचक, प्रकाशक, साहित्यिकांचा इशारा 

पुणे : पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय राज्य सरकारने आठ दिवसांत मागे घ्यावा, अन्यथा या निर्णयाविरोधात इच्छा नसतानाही साहित्यिक, वाचक, प्रकाशक आणि साहित्य संस्थांना सरकार विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा बुधवारी साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांसह साहित्यिकांनी दिला आहे. 
 
तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात काल महाराष्ट्र साहित्य परिषदेत विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व साहित्यिक उपस्थित होते. 
 
मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍या कोवळ्या मुलांवर तिसर्‍या भाषेचे ओझे लादू नका. आमच्या मुलांना मराठक्षतून शिक्षण घेऊ द्या. अशी भुमिका यावेळी जाहीर करण्यात आली. पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय सरकारने तात्काळ रद्द करावा, त्यासाठी काढलेला जुना आणि नवा शासन निर्णय मागे घ्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहे. या मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. देशातील कोणत्याही राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जात नाही, मग महाराष्ट्रात तिसर्‍या भाषेचा हट्ट कशासाठी. मुळात तिसर्‍या भाषेची मागणी कोणी केली आहे. तेही सरकारने स्पष्ट केले नसल्याचा आरोप यावेळक्ष करण्यात आला नाही. 
 
पार पडलेल्या बैठकीला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, लेखक अच्युत गोडबोले, राजीव तांबे, डॉ. केशव देशमुख, मराठी प्रकाशक संघाचे पराग लोणकर, दत्तात्रय पाष्टे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण सभेचे शरद जावडेकर, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे अनिल कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे माधव राजगुरू, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले उपस्थित होते.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण, पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याला आमचा विरोध आहे. राज्य सरकारने तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकविण्याचा निर्णय रद्द करावा. लहान वयात पहिलीला मराठी खेरीज दोन भाषा विद्यार्थ्यांसाठी परक्याच असतात, त्या शिकणे त्याला नक्कीच अवघड जाते, हे बालमानसशास्त्र सांगते. 

Related Articles