हिंदी सक्तीविरोधात ’मनविसे’चा आक्रोश बालभारती केंद्रात पुस्तकांवर शाईफेक   

पुणे : राज्य सरकारने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा तिसर्‍या पर्यायी भाषेच्या स्वरूपात सक्तीने शिकवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या मराठी भाषेविरोधी आणि महाराष्ट्रद्रोही शासन निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बालभारती कार्यालयातील हिंदी पुस्तकांच्या छपाई केंद्रात छपाई सुरू असलेल्या हिंदी पुस्तकांवर शाईफेक करून छपाई बंद पाडण्यात आली. बालभारतीने हिंदी पुस्तके छापली आणि ती वितरित करण्याचा प्रयत्न केला, तर मनविसे तीव्र विरोध करेल.
 
आंदोलनाचे नेतृत्व मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी केले. यावेळी प्र. राज्य संघटक प्रशांत कनोजिया, राज्य उपाध्यक्ष सचिन पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश घोलप, अभिषेक थिटे, शहर उपाध्यक्ष परिक्षीत शिरोळे, विक्रांत भिलारे, विभाग अध्यक्ष केतन डोंगरे, तसेच आशुतोष माने, शशांक अमराळे, हेमंत बोळगे, प्रवीण कदम, मंदार ठोंबरे, मयुर शेवाळे, करन मेहता, निखिल राजपूत, प्रज्वल अडागळे, ओंकार पवार, निरंजन म्हसवडे उपस्थित होते.

Related Articles