’नादब्रह्म’च्या वादन सरावाचा श्रीगणेशा   

पुणे : ढोल-ताशांचा निनाद हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तरुणाई एकत्र येत वाद्यवादनाचा सराव सुरू होतो. पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट) पुणे चा वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, केवळ वाद्यपूजन व सरावाचा श्रीगणेशा न करता यावेळी सामाजिक उपक्रमांचा देखील श्रीगणेशा ’नादब्रह्म’ च्या वादकांनी केला आहे.नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट) पुणेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात इंडियन ह्यूम पाईप कंपनीच्या मागे वाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

Related Articles