गुटखा आणि सिगारेट विकणार्‍या दुकानदारांवर कारवाई   

पुणे : किराणा दुकानात आणि पान टपरीवर गुटखा तसेच सिगारेटची विक्री करणार्‍या कात्रज, आंबेगाव, वडगाव येथील पाच दुकानदारांना अटक करुन त्यांच्याकडून ४९ हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला. आंबेहाव पोलिसांनी ही कारवाई केली.राहुल प्रकाश संचेती (वय-३२, शंभुराजे मित्र मंडळाजवळ, आंबेगाव), प्रमोद प्रकाश संचेती (वय-३६, आंबेगाव), रवींद्र राजकुमार वाकडे (वय-२६, संतोषनगर, कात्रज), सुनिल दगडु सुरवसे (वय-२४, वडगाव) आणि प्रशांत बच्चा कुलाल (वय-४१, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार अजय रामदास कामठे यांनी याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
 
अजय कामठे यांना सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला टपरीवर विक्रीसाठी ठेवला असल्याची बातमी पोलिसांना खबर्‍याकडून मिळाली. त्यावरून, पोलिसांनी आनंद ट्रेडर्स (भाऊंची पुण्याई बिल्डिंग) येथे छापा टाकला. त्या किराणा दुकानात ३९ हजार ६५० रुपयांचा गुटखा व सिगारेटचा माल मिळाला. त्यानंतर, अक्षय पान शॉप येथे छापा टाकला. तेथे ३ हजार ४७० रुपयांचा गुटखा आढळून आला. माऊली पान शॉप या टपरीत ३ हजार ६०० रुपयांचा गुटखा मिळाला. शिवराज पान शॉपमध्ये ३ हजार १८० रुपयांचा गुटखा मिळून आला. आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ ठिकाणी छापा टाकून कारवाई केली या कारवाईत ४९ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासो पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, अविनाश रेवे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles