दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन   

मुंबई,(प्रतिनिधी) : स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेला आज (गुरुवारी) ५९ वर्ष पूर्ण होत असून, वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आज मेळावे होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या या मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करण्याची दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. ठाकरे गटाचा मेळावा सायनच्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. तर,वरळीच्या एनएसइ सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा होणार आहे.
 
वर्धापनदिनासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, मुंबईसह राज्यभरातून पक्षाचे सर्व नेतेमंडळी, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, माजी नगरसेवक, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Related Articles