रास्त भाव दुकान परवान्यांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार   

पुणे :अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात 13 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 
परिमंडळ अधिकारी ’अ’ विभागांतर्गत डांगे चौक गणेशनगर काळाखडक, रहाटणी रामनगर, पिंपळे निलख गावठाण, मामुर्डी शितोळेनगर, परिमंडळ अधिकारी ’ग’ विभागांतर्गत लोहियानगर, परिमंडळ अधिकारी ’ज’ विभागांतर्गत वैभव नगर, तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव, विणी चर्च जवळ गणेशनगर दापोडी, जय शंकर मार्केट चिंचवड स्टेशन, परिमंडळ अधिकारी ’म’ विभागांतर्गत रहाटवडे, कुडजे, खेड, शिवापूर, श्रीरामनगर अशा एकूण 13 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. 
 
रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जाहिरनामा काढलेल्या ठिकाणांसाठी करावयाचे अर्ज संबंधित परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध होतील. पात्रतेच्या अटी व शर्ती आदि माहितीसाठी संबंधित परिमंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा. तरी इच्छुक व पात्र संस्थांनी 31 जुलैपर्यंत संबंधित परिमंडळ अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याची माहिती अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी दिली.

Related Articles