कुशिरेला जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचला   

मंचर,(प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील महाळूंगे वरून कुशिरेला जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचला आहे. रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
माती-गाळ मोठ्याप्रमाणात रस्त्यावर आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी कुशिरे गावचे सामाजिक कार्यकर्ते पप्पु थोरात, माजी उपसरपंच अमोल दाते, शिवाजी धादवड, अमोल अंकुश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती केंगले यांनी केली आहे.

Related Articles