बेन स्टोक्स इंग्लंड संघाचा कर्णधार   

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून लीड्समध्ये सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याआधीच इंग्लंडने आपल्या अंतिम ११ खेळाडूंची यादी जाहीर करून क्रिकेटप्रेमींना चकित केलं आहे. सामन्याच्या ४८ तास आधीच प्लेइंग  दख जाहीर करणं हा इंग्लंडचा एक प्रकारचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. प्लेइंग इलेव्हनमधून तीन महत्त्वाचे खेळाडू वगळण्यात आले आहेत. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तर एका स्पेशालिस्ट स्पिनरला स्थान मिळाले आहे. इंग्लंडने जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि सॅम कुक यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे.पहिल्या कसोटी भारतविरुद्ध इंग्लंड संघ : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.

Related Articles