प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा   

पुणे : शहर बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने शिवम फाउंडेशन च्या वतीने स्व. चेतन रवींद्र फटाले यांच्या स्मरणार्थ क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम, पुणे येथे आयोजित २५ वी भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जयसिंगराव मोहिते अध्यक्ष शिवम फाउंडेशन. यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील १५० खेळाडूंनी  सहभाग घेतला होता.
 
साई बॉक्सिंग क्लब सांगवीचा खेळाडू प्रज्वल  सितापुरेने नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेतील बेस्ट बॉक्सर पुरस्कार पटकावला. एम. आय जे.एस. बॉक्सिंग क्लब  गार्गी तांबे  ने मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर, तर महाराणा प्रताप बॉक्सिंग क्लबच्या प्रितेश राठोड ने बेस्ट चॅलेंजर हा बहुमान पटकावला.लायन्स क्लब, पुणे शहराचे अध्यक्ष दीपक थोरात ,पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष मा. नगरसेवक अविनाश बागवे,रवींद्र फटाले राजेंद्र तांबेकर, राजेश टिकार , शिवम फाउंडेशन चे सचिव सुरज रेणुसे , शिवम फाउंडेशन चे कार्याध्यक्ष स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाश रेणुसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे तांत्रिक अधिकारी भरतकुमार व्हावळ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शहर संघटनेचे सचिव विजय गुजर पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी , 
 
आंतरराष्ट्रीय ऑफिशियल कॅप्टन सुरेश कदम , आंतरराष्ट्रीय खेळाडू कॅप्टन तुक बहादूर थापा, आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत पुणे शहराचे कमिशन चेअरमन सुरेश गायकवाड, महाराष्ट्र टेक्निकल ऑफिसर अशोक मेमजादे, डॉ. राहुल पाटील, जीवन निंदाने, असिफ शेख, रॉबर्ट दास,  उमेश जगदाळे, प्रदीप वाघे, कुणाल पालकर, शकील शेख  ई. पंचांनी स्पर्धेचे आयोजनात मोलाची कामगिरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच ऋषीकांत वचकल यांनी केले. 

Related Articles