ह्रिदयाचे कराटेमध्ये सुवर्णपदक   

पुणे : देशातील नामांकित  कराटे स्पर्धा नुकतीच देहराडून येथे पार पडली. यामध्ये चॅम्पियन्स कराटे क्लब, पुणे येथील उभरती खेळाडू ह्रिदया अमित काकड हिने पुन्हा एकदा आपली चमकदार कामगिरी सिद्ध करत, १० वर्षे/३० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, ह्रिदयाने सलग दुसर्‍या वर्षी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दुहेरी विजय संपादन केला आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. या वर्षी अंतिम फेरीत उत्तर प्रदेशच्या रोहिल्ला हानिका हिला पराभूत करत तिने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत ३० राज्यांतील गुणवत्ता असलेले खेळाडू सहभागी झाले होते. ह्रिदया सध्या ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. ती चॅम्पियन्स कराटे क्लबचे राष्ट्रीय कोच सेन्सेई दीपक शेंद्रे यांच्याकडे सातत्याने प्रशिक्षण घेत आहे.लवकरच ती इंटरनॅशनल कराटे युथ लीगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या दुहेरी सुवर्णयशाबद्दल उघउ महाराष्ट्रचे चीफ विजय महाडिक आणि चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक शिहान संतोष मोहिते यांनी तिचे अभिनंदन करत, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles