ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली   

नवी दिल्ली : उद्योगपती आणि खासदार प्रियांंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणी समन्स बजावले होते. मात्र, कार्यालयात हजर होण्याऐवजी त्यांनी मंगळवारी समन्सला केराची टोपली दाखविली आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्यांना दुसर्‍या वेळी ईडीने समन्स बजावले होते. ब्रिटनमधील शस्त्र सल्लागार संजय भंडारी यांच्याशी वढेरा याचे लागेबांधे असल्याचा संशय ईडीला आहे. प्रकरणात आर्थिक अफरातफर केल्याच्या आरोपाखाली त्यांची चौकशी ईडीला करायची आहे. त्यासाठी त्यांना समन्स बजावले होते. यापूर्वी त्यांना दहा जूनला असेच समन्स बजावले होते. तेव्हा कोरोना चाचणी करायची असल्याचे कारण त्यांनी आदल्या दिवशी दिले होते..त्यामुळे दुसरे समन्स बजावून काल चौकशीला हजर राहण्यास ईडीने सांगितले होते. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी सांगितले की, चौकशीसाठी वढेरा तयार आहेत. ते मुद्दामून गैरहजर राहात नाहीत. ते परदेश दौर्‍यावर जाण्यापूर्वी किंवा पुढील महिन्यात दौर्‍यावरुन परत आल्यावर चौकशीला सामोरे जातील.  

Related Articles