शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक   

आज पुणे-बंगळुरु महामार्गावर रस्ता रोखा आंदोलन

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षही एकवटले आहेत. या महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह १२ जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे. मात्र, सरकारकडून शक्तीपीठ होणारच अशी भूमिक भूमिका घेतली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (मंगळवार) शेतकरी दिनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलावर रस्ता रोखा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये शेतकर्‍यांसह सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
 
दरम्यान, शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तसेच साखर कारखानदारांनी शक्तीपीठ विरोधी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.
 
 

Related Articles