एअर इंडियाच्या अडचणी थांबेनात   

सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

मुंबई : एअर इंडियाच्या अडचणी काही थांबेनात! विविध कारणांमुळे मंगळवारी सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यान, सॅन फ्रान्सिस्को-मुंबई विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांना कोलकातामध्ये उतरावे लागले.
 
टाटा समूहाने साडेतीन वर्षांपूर्वी एअर इंडिया विकत घेतले. मात्र, मागील काही दिवसांपासून एअर इंडियास मोठ्या अडचणींचा सामना करावे लागत आहे. विमान वाहतूक नियामककडून उड्डाणांपूर्वी विमानांची कसून तपासणी केली जात आहे. काल  एअर इंडियाने बंगळुरू-लंडन, लंडन-अमृतसर, दिल्ली-व्हिएन्ना, दिल्ली-दुबई आणि मुंबई-सॅन फ्रान्सिस्को विमान उड्डाण रद्द केले. दरम्यान, अहमदाबाद-लंडन उड्डाण विमान उपलब्ध नसल्याने रद्द करण्यात आले, असे एअर इंडियाने सांगितले. तसेच, तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द झाल्याचा दावा एअर इंडियाने फेटाळून लावला.  प्रवाशांना गंतव्य स्थानावर पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. ज्यांनी प्रवासच रद्द केला त्यांना तिकिटाची रक्कम परत केली जाईल अन्यथा अन्य दिवशी प्रवासाची मुभा दिली आहे, असेही एअर इंडियाने म्हटले आहे.

Related Articles