अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ   

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ देण्यात ओली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आणि प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता विद्यार्थांना २६ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. 
 
राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक लाख २८ हजार १०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी एक लाख १० हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज जमा केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 
 
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि इतर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, पाटीलयांनी सांगितले. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in `m या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related Articles