‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन   

मुंबई, (प्रतिनिधी) : ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला  नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके (ता. दिंडोरी) येथील २९ हेक्टर ५२ आर जमीन देण्यास मंगळवारी  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.या निर्णयामुळे आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना त्यांचा उद्योग उभारण्यासाठी  भूखंड उपलब्ध होणार आहे. आदिवासी भागात रोजगार निर्मिती आणि  आर्थिक विकासास चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयानुसार दिंडोरी तालुक्यातील मौजे जांबुटके येथील  जमीन ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतरित करण्यात येणार आहे.
 
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यात प्रकल्प जमिनीशी संबंधित करारावर लागणार्‍या मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. पेण तालुक्यात स्थापन होणार्‍या या ग्रोथ सेंटरचा समावेश नवीन शहर विकास प्राधिकरण क्षेत्रात होतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून एमएमआरडीएने एकात्मिक वसाहत धोरणानुसार १२१७.७१ एकर जमीन विशेष उद्देश संस्थेच्या   (एसपीव्ही ) नावे नोंदविण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

Related Articles