कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा   

बेल्हे, (वार्ताहर) : मागील महिन्यात कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी २६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, अद्यापही कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली नाही. कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात मंगळवार (१७ जून) अखेर ३.१४९ टीएमसी (१०.६१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
मागील वर्षी प्रकल्पात मंगळवारी (१६ जून) अखेर ०.९१४ टीएमसी (३.०८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षाच्या तुलनेत कुकडी प्रकल्पात २.२३५ टीएमसी (७.५३ टक्के) जास्त उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील एक महिन्यात कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणी साठ्यात १.६७६ टीएमसी वाढ झाली आहे. जुन्नर तालुक्यात १२ मे पासून पाऊस सुरू आहे. मे महिन्यात तालुक्यात सरासरी १८५ मिलिमीटर पाऊस झाला होता. एक जूनपासून सोमवारी (१६ जून) अखेर कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी ७६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील महिनाभरात कुकडी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात १.६७६ टीएमसी वाढ झाली आहे. कुकडी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मागील वर्षी जुलै महिन्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती.
 
कुकडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या येडगाव, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगे या धरणांच्या तुलनेत डिंभे धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यात जवळपास ०.५ टीएमसीने वाढ झाली आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत महत्त्वाच्या पिंपळगाव जोगे व माणिकडोह धरणाने तळ गाठला आहे.

यावर्षी मे महिन्यापासूनचा धरणांतील पाणीसाठा

येडगाव : ०.७९२ टीएमसी (४०.७५ टक्के), वडज : ०.२८३ टीएमसी (३४.१३ टक्के), माणिकडोह : ०.५३५ टीएमसी (५.२६ टक्के) 
डिंभे :१.५३९ टीएमसी (१२.३२ टक्के).
 

Related Articles