नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग   

नागपूर : इंडिगोच्या विमानात मंगळवारी सकाळी बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर या विमानाचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग  करण्यात आले. हे विमान कोचीहून दिल्लीकडे जात होत.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे विमानतळावर काही वेळ एकच गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले आहे. 
 
गेल्या वीस मिनिटांपूर्वी विमान नागपूर विमानतळावर उतरले आहे. मात्र तपासादरम्यान धोकादायक वस्तू आढळलेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ते कसून तपास सध्या करत आहे. प्राप्त माहितीनुसार, हे विमान सकाळी ९.२० वाजता कोचीहून निघालेले आणि दुपारी १२:३५ वाजता दिल्लीत उतरणारे होते. अशातच विमानातील अधिकार्‍यांना धोकादायक इशारा मिळाल्यानंतर हे विमान नागपूरला वळवण्यात आले. 

Related Articles