युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या   

अमृतसर : युट्यूबर कांचन कुमारी यांची हत्या नुकतीच करण्यात आली. या प्रकरण दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. समाज माध्यमांवर वादग्रस्त गाण्याच्या चित्रफिती ती प्रसारीत करत होती त्यामुळे तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कांचन उर्फ कोमल कौर भाभी या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. चित्रफितीतील गाण्यातून शीख धर्मीय नागरिकांच्या भावना दुखावल्याचा 
 
आरोप करत मोगा येथील जगप्रीत सिंग (वय ३२) आणि तरणतारण येथील निर्मजित सिंग (वय २१) यांनी तिची हत्या गेल्या आठवड्यात केली होती. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, कांचन यांचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ८४ हजार फॉलोअर आहेत.युट्यूटबर त्यांचे फनी भाभी टीव्ही चॅनल असून २ लाख ३६ हजार सबस्क्रायबर आहेत. 

Related Articles