कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये   

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे आता टोण्ड दूध ५७ रुपये प्रति किलोने ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तरी नेहमीप्रमाणे ग्राहकांनी दूध दराची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालयाने केले आहे. संघाच्या वाहतूक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्री दर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने जिल्हा दूध संघाचे १६ जूनच्या मध्यरार्त्रीपासून १७ जून २०२५ च्या पहाटेपासून टोण्ड दूधाच्या विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे.

Related Articles