सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा   

पुणे म्हाडाकडून आवाहन

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने १९८१ मधील तरतुदीनुसार पुणे, सोलापुर, सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५२ अनिवासी गाळे व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने वितरीत करण्याचे नियोजित आहे. 
 
विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण, सामाजिक आरक्षण, अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहितीसाठी www.eauction.mhada.gov.in  व www.mhada.gov.in संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी केले आहे.
 
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांचेमार्फत १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी रिक्त राहिलेल्या सदनिका विकासकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्याचे नियोजित आहे. वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना सदनिका वितरीत करण्यासाठी १० एप्रिल २०२५ दुपारी १२.०० वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.
 
अर्जदारांना सुचित करण्यात येते, कि त्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा. विकासकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील तसतशा प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रीया निरंतर चालू राहिल, गरजू व पात्र लाभार्थ्यांनी https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर नोदणी पुर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा.
 
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची घोषणा केली असून त्यास अनुसरुन राज्य शासनाने सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) २.० राज्यात अंमलबजावणी करण्याचा शासनाने घेतला आहे. वरील योजनेअंतर्गत बांधण्यात येणार्‍या सदनिकांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी व निवड प्रथम करावयाची असल्याने https://pmaymis.gov.in PM­Ymis2 2024/­uth/Login.aspx  या यूनिफाईड वेब पोर्टलवर या वेबलिंकवर सदनिका घेण्यास इच्छुक असणार्‍या अर्जदारांनी नोंदणी करावी आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles