E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भुशी धरण ओव्हर फ्लो!
Wrutuja pandharpure
17 Jun 2025
१५ दिवस अगोदरच ओसंडून वाहू लागले | पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
लोणावळा
(वार्ताहर) : पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेले मावळ तालुक्यातील भुशी धरण हे सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले व परिसरातील व्यावसायकांनी जल्लोष केला. मागील महिनाभरापासून पडणार्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढला होता. त्यामुळे आता भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.
सहारा पुल धबधबा व भुशी धरणावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने धरणाच्या पायर्यांवर बसून भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता आला. मागील आठवड्यांपासून पर्यटक भुशी धरण भरण्याची वाट पाहत होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखील पर्यटक धरणावर गर्दी करत होते. मागील आठवड्यापासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा संपवली आहे. मागील वर्षी ३० जून रोजी भुशी धरण भरले होते. या वर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे.
संततधार कोसळणार्या पावसामुळे डोंगरातील धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरणही ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पायर्यांवर पाणी वाहू लागले आहे. पर्यटक याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल, तर भुशी धरणाचा चांगला पर्याय आता उपलब्ध झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मागील दोन वीकेंडलाही लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती. गेल्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी जोरात पाऊस झाल्याने अनेकांना वाटत होते की भूशी धरण ओव्हरफ्लो होईल. मात्र भुशी धरण भरलेे नसल्यामुळे पर्यटकांना हवा तसा आनंद घेता आला नाही. पण आता भुशी धरणाच्या पायर्यांवर पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. सोमवारी धरणाच्या पायर्यांवरून पाणी ओसांडून वाहताच पर्यटकांनी यथेच्छ भिजण्याचा आनंद घेतला असून येथील लहान मोठ्या व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
Related
Articles
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
05 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सहकार्याचा अभाव (अग्रलेख)
2
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
5
आखाती युद्धामुळे गृहोपयोगी वस्तू महागणार
6
कथा जानकीच्या जन्माची