वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी   

३४ सरकारी अधिकार्‍यांवर गुन्हा

गैरप्रकाराचे जाळे सीबीआयकडून उद्ध्वस्त

नवी दिल्ली : वैद्यकीय महाविद्यालयांतील नियमांच्या चौकटीत फेरफार करण्याचे जाळे केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) शुक्रवारी उद्ध्वस्त केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अधिकारी, दलाल आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू होता या प्रकरणी  ३४ सरकारी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
सीबीआयने आरोपपत्रात ३४ अधिकार्‍यांची नावे नमूद केली आहेत. त्यामध्ये आरोग्य मंत्रालयाच्या आठ अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अधिकारी आणि पाच डॉक्टरांचा समावेश आहे. ते राष्ट्रीय वैद्यकीय आयुक्तही आहेत.
 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे अध्यक्ष डी. पी. सिंग, गीतांजली विद्यापीठाचे रजिस्ट्रार मयूर रावळ, रवपुत्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि संशोधनचे अध्यक्ष रवी शंकर जी महाराज अणि इंडेक्स वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश सिंह भदोरिया यांची नावेही आरोपत्रात आहेत. 
 
सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, या प्रकरणी आठ जणांना ५५ लाखाच्या लाच प्रकरणी नुकतीच अटक केली. त्यामध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे तीन डॉक्टर आहेत. त्यांनी रावपुत्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि संशोधन संस्थेला अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच घेतली होती. वैद्यकीय क्षेत्रातील हे सर्वात मोठे हेराफेरीचे जाळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. आठही अधिकारी गैरप्रकार करुन लाचखोरी करत असल्याचा आरोप सीबीआयचा आहे. 
 

Related Articles