पोलिसांकडून दोघांची चौकशी   

कोंढवा अत्याचार प्रकरण

पुणे : कुरिअर कर्मचारी असल्याची बतावणी करून २२ वर्षाच्या तरूणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी कोंढवा परिसरात घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन संशयितांची चौकशी केली आहे. आरोपी हा तरूणीला आधीपासूनच ओळखत असल्याची माहिती तिच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. पीडीत तरूणी ही कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीमध्ये काम करते. कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये ती आणि तिचा भाई दोन वर्षांपासून राहतात. तिचा भाऊ काही कामानिमित्त गावे गेला होता. त्यावेळी, हा सर्व प्रकार घडला. 
 
आरोपीने कुरिअर कंपनीचा कर्मचारी असून बँकेचे कागदपत्रे आल्याचे तिला सांगितले. तीने हे कुरिअर आपले नसल्याचे सांगितल्यानंतरदेखील, तुम्हाला सही करावी लागेल, असे आरोपीने तिला सांगितले. त्यामुळे, तिने सेफ्टी दरवाजा उघडला. त्यानंतर, ती सही करण्यासाठी मागे फिरल्यानंतर, तो घरात घुसला आणि दरवाजा बंद केला.  त्यानंतर त्याने तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारला. तरुणी बेशुद्द झाली.तरूणी बेशुद्ध झाल्याचा गैरफायदा घेऊन, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर मोबाईलमध्ये सेल्फी घेतला. याबद्दल कुणाला सांगितले तर खून करण्याची धमकी दिली आणि मी पुन्हा येईन, असा मेसेज त्याने टाईप करून तो निघून गेला.
 
पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पथके नेमण्यात आले आहेत. फॉरेन्सिक पथकाने तरुणीच्या नाक आणि तोंडाचे नमुने घेतले असून, तोंडावर मारलेला स्प्रे कोणता होता, याचीही तपासणी केली जाणार आहे. पोलिसांनी सोसायटीतील सीसीसीटीव्हीची पाहणी केली. त्याचबरोबर गेटवरील आलेल्या-गेलेल्यांची यादीही बघण्यात आली. प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, आरोपी तरुणीला आधीपासून ओळखत होता.दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून हलगर्जीपणा केला गेला का? आरोपी इतक्या सहजपणे आतमध्ये कसा घुसला?, याचीही चौकशी केली जाणार आहे.

Related Articles