जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी   

बर्मिंगहॅम : कसोटी सामन्यात शुक्रवारी तिसर्‍या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने दमदार सुरुवात करत इंग्लंडच्या संघाची अवस्था ५ बाद ८७ धावा अशी केली. संघ अडचणीत असताचा इंग्लंडचा यष्टीरक्षक आणि अनुभवी फलंदाज जेमी स्मिथने विक्रमी शतकी खेळी साकारली. अर्धा संघ तंबूत परतल्यावर या पठ्ठ्यानं ८० चेंडूत शतक साजरे करत केले. इंग्लंडच्या संघाकडून त्याने कसोटीत तिसर्‍या जलद शतकाची नोंद केली. एवढेच नाही तर या शतकी खेळीसह १४८ वर्षांत जे कुणाला जमलं नाही तो पराक्रम त्याने करून दाखवला. 
 
जेमी स्मिथने ८० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्यानंतर तिसर्‍या दिवसाच्या अंतिम टप्प्यात हॅरी ब्रुक याने १५० धावा केल्या आणि जेमी स्मिथ याने १५९ धावा करत संघासाठी दोन दीडशतके साकारली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने मोठी आघाडी घेतली. ७७.३ षटकांत ३६६ धावा करताना ५ फलंदाज गमावले. याआधी १८७७ मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर जेमी स्मिथ हा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला ज्याने लंचपूर्वी एका सत्रात १०० पेक्षा अधिक धावा केल्या. लंच आधी हॅरी ब्रूकसह त्याने १६५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
 
जो रूट आणि हॅरी ब्रूक या जोडीनं ३ बाद ७७ धावांवरून तिसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. इंग्लंडच्या धावफलकावर ८५ धावा असताना मोहम्मद सिराजनं जो रुटच्या रुपात इंग्लंडच्या संघाला चौथा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला बेन स्टोक्सही शून्यावर माघारी फिरला. संघ अडचणीत असताना जेमी स्मिथनं आक्रमक अंदाजात फलंदाजी करत लंच आधी शतक साजरे केले. 

Related Articles