मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली   

इंग्लंड दौर्‍याआधी करुण नायरचे खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली : करुण नायर २०१८ वर्षामध्ये भारतीय संघातून बाहेर झाला होता. त्यानंतर त्याने घरेलू क्रिकेटमध्ये खूप चांगले प्रदर्शन केले, पण त्यानंतर सुद्धा त्याचे संघात पुनरागमन झाले नाही. यानंतर देखील त्याने घरेलू क्रिकेटमध्ये हिम्मत न हारता चांगली मेहनत केली आणि आता त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. ७ वर्षानंतर करून नायरला पुन्हा भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आता करुण नायर खेळताना दिसणार आहे. त्याने त्याचे मागचे दिवस आठवताना खुलासा केला आहे की, त्याने माजी खेळाडूच्या सल्ल्याला दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे तो आज खूप खुश आहे.
 
भारतीय संघात पुनरागमन करणार्‍या करून नायरला एकावेळी स्टार खेळाडूने निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे तो लीग क्रिकेट खेळून कमी पैसे कमवू शकेल. त्यावेळी नायरने तो सल्ला मानला नाही. डेली मेलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये नायरने म्हटले की, मला अजूनही आठवते एका प्रमुख भारतीय क्रिकेटरने मला फोन करून म्हटले होते की तू निवृत्ती घेतली पाहिजे. कारण या लीगमध्ये मिळणारा पैसा मला सुरक्षित ठेवेल. हे करणे सोपे असेल पण मला वाटले होते की, पैसे मिळाले तरी एवढ्या सहजपणे निवृत्ती घेतली असती तर ते मला आवडले नसते.
 
त्याचा याच इंटरव्यूमध्ये करुण नायरने म्हटले, मी पुन्हा भारतीय संघासाठी खेळण्यात हार मानली नाही. ही फक्त दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि तुम्ही पाहत आहात आता मी कुठे आहे. भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतरही करुण नायरने काउंटी क्रिकेट खेळले, तिथे त्यांनी खूप शानदार प्रदर्शन केले. याशिवाय रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याने शानदार फलंदाजी केली. ज्या कारणाने तो आता इंग्लंड विरुद्ध पुन्हा खेळण्यासाठी तयार दिसत आहे.

Related Articles