कोलकाता अत्याचार प्रकरण   

 

चार आरोपींना अटक

कोलकाता : कोलकात्यातील कायदा महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांंनी शुक्र्रवारी चौघांना अटक केली.  चौघांना गुन्हा घडलेल्या ठिकाणी नेण्यात आले आणि घटनेचा मागोवा घेण्यात आला. प्रकरणात तीन प्रमुख आरोपी आहेत. ते माजी विद्यार्थी असून एक कर्मचारी मनोज मिश्रा आहे. तसेच अन्य आरोपीत सध्या शिकणार्‍या  विद्यार्थ्यांची नावे परमित मुखर्जी आणि जैब अहमद अशी असून आणि एक सुरक्षा रक्षक पिनाकी बॅनर्जी अशी आहेत. त्यांना काल पहाटे चार वाजता चार तासांच्या प्रक्रियेनंतर चौघांना अटक केली. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून नव्याने ते दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. चौघांना दक्षिण कोलकाता येथील कायदा महाविद्यालयात सकाळी घटनास्थळी नेण्यात आले. घटनेचा मागोवा घेतला. 

Related Articles