मुंबई : हाँगकाँगहून दिल्लीकडे झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग- ७८७-८ ड्रीमलायनर विमान सोमवारी तासाभरातच पुन्हा विमानतळावर परतले.एअर इंडियाच्या एआय-३१५ मध्ये तांत्रिक बिघाडाचा संशय वैमानिकास आला. त्यामुळे, तातडीने हे विमान माघारी परतले.या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, विमानाची तपासणी सुरु असल्याचेही म्हटले आहे.हाँगकाँगहून हे विमान काल दुपारी १२.१६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) निघाले होते. तर, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.३० वाजता दिल्लीत पोहोचणार होते. वास्तविक, हे विमान तीन तास उशिरा होते. नियमित वेळापत्रकानुसार ते सकाळी ८.५० वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते.
Fans
Followers