कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात   

तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली 

पुणे : कोथरूड येथील वेदभवन पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात एका मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तर अन्य दोन मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अपघाताची माहिती मिळताच कोथरूड पोलिस, अग्निशमन दलाच्या दोन गाडया आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलांच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. जखमी चालकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. कोथरूड पोलिस अपघातग्रस्त वाहनांची तपासणी आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पुढील तपास करीत आहेत. 
 

 

Related Articles