अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प   

वॉशिंग्टन : इस्रायल आणि इराणमधील संघर्षात अमेरिकेचा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे इराणने अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नये. अन्यथा आम्ही अशी कारवाई करू की, ज्याचा इराणने कधीही विचार केला नसेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘इराणवरील हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही; पण जर इराणने अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिका पूर्ण लष्करी ताकदीने हल्ला करेल. इराणने अशी कारवाई यापूर्वी कधीही पाहिली नाही.’
 
दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी अणुकराराबद्दल मोठे विधान केले होते. इस्रायलकडे अनेक धोकादायक शस्त्रे आहेत. इराणमध्ये कराराला विरोध करणारे सर्व मारले गेले. इराणकडे अजूनही संधी आहे. आता अणुकरार करा नाहीतर   आणखी विनाश होईल, असे त्यांनी म्हटले होते.इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्रायली हल्ल्यांना अमेरिकेचा पाठिंबा होता. या हल्ल्यांमुळे अमेरिकेशी अणुकरारांवरील  चर्चेची शक्यता पूर्णपणे संपली आहे.दरम्यान, रविवारी ओमानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये होणारी अणू चर्चा रद्द करण्यात आली. इराणने लगेच अणु करार करावा, असे आवाहन ट्रम्प यांनी तेहरानला केले होते. 
 

Related Articles