सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर   

नवी दिल्ली : ज्येष्ठ पोलिस अधिकारी आरए चंद्र शेखर यांची मंत्रिमंडळ सचिवालयात सुरक्षा (सचिव) पदी नियुक्ती करण्यात आलीे.  या संदर्भातील माहिती कार्मिक मंत्रालयाने दिली. शेखर हे केरळच्या भारतीय पोलिस सेवेच्या १९९१ च्या तुकडीचे पोलिस अधिकारी आहेत.सध्या ते गुप्तचर विभागात विशेष संचालकपदी कार्यरत आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांची सुरक्षा (सचिव) पदी नियुक्ती केली. १ ऑगस्टपासून त्यांची नियुक्ती केली असल्याचे १४ जून रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. विद्यमान सुरक्षा (सचिव) हरीनाथ मिश्रा यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यांच्या रिकाम्या जागी शेखर यांची नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षा पुरविणार्‍या विशेष संरक्षण गट (एसपीजी) च्या  सुरक्षा सचिव हे प्रशासकीय प्रमुख असतात. 
 

Related Articles