हैदराबाद : बासर येथील एका मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरताना पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला.हैदराबादमधील २० जणांचा एक गट प्रसिद्ध ज्ञान सरस्वती मंदिरात प्रार्थना करण्यासाठी बसरला गेला होता. मंदिरात जाण्यापूर्वी गटातील पाच मुले आंघोळीसाठी नदीत उतरले. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे हे पाचही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fans
Followers