एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले   

लखनौ : गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून कोलकात्याला जाणार्‍या एअर इंडियाच्या आय ५-४१५१ या विमानात रविवारी तांत्रिक बिघाड झाला.  नियोजित वेळेनुसार उड्डाणासाठी सज्ज असलेले हे विमान शेवटच्या क्षणी थांबवण्यात आले. जवळपास दीड तास विमान धावपट्टीवर थांबण्यात आले होते.
 
एअर इंडियाने यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंडन-कोलकाता विमानात तांत्रिक अडचण आढळल्याने उड्डाण काही वेळ थांबविण्यात आले होते. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तांत्रिक तपासणीनंतर आणि अभियंत्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विमान उड्डाणासाठी रवाना करण्यात आले. तांत्रिक बिघाडाचे नेमके स्वरुप अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Related Articles