अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात रुग्णवाहिका आणि मालवाहू वाहन यांच्यात पूर्वांचल द्रुतगती मार्गावर अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हरयानातून बिहारकडे रुग्णवाहिकेतून मृतदेहाची वाहतूक केली जात होती. दुर्घटनेत रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची ओळख पटली असून तो बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी असल्याचे उघड झाले.
Fans
Followers