भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक   

नागपूर : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीची बैठक रविवारी येथे झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील भाजप आणि संघाचे अधिकारी उपस्थित होते. 
 
संघाच्या विदर्भ प्रांताचे संघटक, विदर्भ प्रांत संचालक, नागपूर महानगर संघचालक आणि अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते. विदर्भातील संघ आणि परिवाराशी संबंधित संघटना यांची एक वार्षिक बैठक रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिरात पार पडली. सूत्रांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत कोणती चर्चा झाली ? याचा तपशील समजलेला नाही. मात्र, विदर्भातील संघ आणि परिवाराशी संबंधित संघटनांसाठी बैठक आयोजित केली असल्याचे सूत्रांंनी सांगितले.

Related Articles