९० हजाराच्या भेळीचा गैरव्यवहार सुळे यांनी आणला चव्हाट्यावर   

बारामती, (प्रतिनिधी) : सत्ता आल्यानंतर सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने कर्मचारी भरती केली जाईल, असा शब्द देत संचालक मंडळाला पूर्ण स्वायत्त दिले जाईल, मात्र हे व्यक्त करीत असतानाच ९० हजाराच्या भेळचा उल्लेख करत वैयक्तीक खर्चासाठी कारखान्याचा निधी वापरला जाणार नाही, असे स्पष्ट मत 
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ पणदरे, बारामती येथे करण्यात आला. यावेळी सुळे बोलत होत्या. 
 
खासदार सुळे म्हणाल्या, या अगोदर विरोधी दोन्ही गटांना संधी दिली आहे. यावेळी बळीराजा सहकार बचाव पॅनेलला संधी देण्याचे आवाहन करीत, ही निवडणुकीत चर्चेतून मार्ग निघेल असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. तर नीरा नदी प्रदूषणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत. नीरा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपण काम करणार आहे.  कारखाना पारदर्शक पद्धतीने चालला पाहिजे आणि शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे जास्त पैसे मिळाले पाहिजेत याकडे लक्ष देणार असल्याचे सुळे यांनी सांगितले. सुळे पुढे म्हणाल्या,  कारखान्यावर आपली सत्ता आल्यानंतर सोमेश्वश्वर कारखान्याच्या धर्तीवर ऊसतोडणी अ‍ॅप माळेगाव कारखान्यात उपलब्ध केले जाईल, तसेच एआयचा वापर देखील उस उत्पादन वाढीसाठी करण्यात येणाऱ असल्याचे सुळे यांनी सांगितले. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूकी बळीराजा सहकार बचाव पॅनेलला मतदार साथ देतील असा विश्वास खासदार सुळे यांनी व्यक्त केला.
 
बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार  गट क्र. १  माळेगांव (सर्व साधारण ऊस उत्पादक गट) अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलतराव काटे, श्रीहरी पांडुरंग येळे.  गट क्र. २ पणदरे  (सर्व साधारण ऊस उत्पादक गट) दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग हनुमंतराव जगताप, सुशिलकुमार उत्तम जगताप. गट क्र. ३  सांगवी (सर्व साधारण ऊस उत्पादक गट) संजय नामदेव तावरे, सुरेश तुकाराम खलाटे, राजेंद्र अशोकराव  जाधव   गट क्र. ४  खांडज - शिरवली (सर्व साधारण ऊस उत्पादक गट) सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी पोंदकुले
 
गट क्र. ५ नीरावागज (सर्व साधारण ऊस उत्पादक गट) शरदचंद्र शंकरराव तुपे, गणपत शंकर देवकाते , गट क्र. ६  बारामती (सर्व साधारण ऊस उत्पादक गट) प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी, महिला राखीव प्रतिनिधी, शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहनराव गावडे, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी राजु श्रीरंग भोसले, भ. वि. जाती जमाती प्रतिनिधी, ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी भरत दतात्रय बनकर.
 

Related Articles