पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू   

अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. यामध्ये अहमदाबादमधील अनिल पटेल यांचा मुलगा हर्षित आणि सून पूजा यांचाही समावेश होता. दोन वर्षांपूर्वी आजाराने पत्नी गमावल्यानंतर गुरुवारी अनिल यांना नशिबाने आणखी हा आणखी एक 
धक्का दिला. 
 
हर्षित आणि पूजा हे दोघेही दोन वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहतात. हर्षित एका ई-कॉमर्स कंपनीत काम करत होता. महाविद्यालयात असताना हर्षित पूजाच्या प्रेमात पडला आणि नंतर त्यांनी लग्न केले. वडिल अनिल यांना भेटण्यासाठी अचानक अहमदाबादला आले होते. कारण वडिलांच्या चेहर्‍यावरचा आनंद त्यांना पाहायचा होता. दहा दिवसानंतर गुरूवारी ते पुन्हा लंडनला निघाले. 
    
अहमदाबाद विमानतळावर आपल्या मुलाला आणि सुनेला सोडताना अनिल खूप आनंदी होते; पण हा त्यांच्या मुलांचा शेवटचा प्रवास असेल, याची त्यांना  कल्पना नव्हती. विमान उड्डाणानंतर काही वेळातच ते कोसळले. गुरूवारी दिवसभर त्यांनी मुलाचा आणि सूनेचा शोध घेतला मात्र, त्यांची माहिती मिळाली नाही. शुक्रवारी त्यांना रूग्णालयात दोघांचे मृतदेह असल्याचे समजले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पटेल यांनी त्यांचा डीएनए नमुना दिला आहे आणि ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या अवशेषांबद्दल रुग्णालयाकडून फोन येण्याची वाट पाहत आहेत. 

Related Articles