कांची शंकराचार्य यांची ’आर्ट ऑफ लिव्हिंग’ केंद्राला भेट   

पुणे : श्री कांची कामकोटी पीठाचे ७० वे पीठाधिपती, शंकर विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी यांनी नुकतीच बंगळूरु येथील कनकापुरा रस्त्यावरील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्राला सदिच्छा भेट दिली. 
 
या भेटीदरम्यान शंकराचार्य स्वामींनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या ध्यान, शांतता आणि आध्यात्मिकतेच्या प्रसारासाठी चाललेल्या जागतिक कार्याचे  कौतुक केले. त्यांच्या सेवाभावी उपक्रमांना, भारताच्या प्राचीन वेदपरंपरेच्या संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांना, तसेच सामान्य लोकांपर्यंत अध्यात्म सुलभपणे पोहोचवण्यासाठीच्या योगदानाला त्यांनी उच्च गौरवाने मान्यता दिली.शंकराचार्यांनी आश्रमातील गुरुकुल, गोशाळा व विविध अध्यात्मिक प्रकल्पांना भेट देत समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी देश-विदेशातून आलेल्या साधकांशी संवाद साधत मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायक विचार मांडले.

Related Articles