E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
लीड्स
: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू होणार आहे. या सामन्यासह भारतीय क्रिकेटमध्ये नवीन कर्णधार शुभमन गिलचा युग सुरू होईल. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गिलचं कर्णधारपद आणि फलंदाज म्हणून त्याची कशी कामगिरी असले यावर लक्ष असेल. मालिका सुरू होण्यापूर्वीच, भारतीय कर्णधाराने याची झलक दाखवली आहे आणि टीम इंडियाच्या इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आहे.
कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया आणि इंडिया-अ यांच्यातील इंट्रा-स्क्वॉड सराव सामना शुक्रवार १३ जूनपासून सुरू झाला. या तीन दिवसांच्या सामन्याद्वारे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कसोटी मालिकेसाठी आपला सामना सराव सुरू केला. यापूर्वी टीम इंडिया गेल्या सुमारे ५ दिवसांपासून बेकेनहॅममध्ये नेटचा सराव करत होती. शुक्रवारपासून या मैदानावर टीम इंडियाने आपला सराव सामना सुरू केला, ज्यामध्ये एका बाजूला गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आहे आणि दुसर्या बाजूला अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली इंडिया अ संघ आहे, जो काही दिवसांपूर्वीपर्यंत इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळत होता.
पण, टीम इंडियाने आधीच हा सामना मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच या सामन्याच्या पहिल्या दिवशी कोणतेही कव्हरेज आणि रिपोर्ट आले नाहीत. परंतु पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिवसाच्या खेळाचे अपडेट दिले. असे सांगण्यात आले की कर्णधार शुभमन गिलने पहिल्या दिवशी शानदार अर्धशतक झळकावले, तर संघाचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज केएल राहुलनेही आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि अर्धशतक झळकावले.
या दोघांव्यतिरिक्त, आणखी एका खेळाडूने आपला लौकिक दाखवला आणि तो म्हणजे शार्दुल ठाकूर, ज्याने पहिल्या दिवशी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. आता कोणी किती धावा केल्या आणि कोणी किती विकेट्स घेतल्या याचे अचूक आकडे बीसीसीआयने दिलेले नाहीत. परंतु भारतीय कसोटी कर्णधार म्हणून गिलचे कोणत्याही सामन्यातील पहिले अर्धशतक हे एक चांगले संकेत आहे. शुभमन गिलचा परदेशात रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही आणि त्यामुळेच, त्याच्या कर्णधारपदापेक्षा त्याच्या फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. टीम इंडियाला आशा आहे की, तो हेडिंग्ले कसोटीतही अशीच कामगिरी करेल आणि पुढील ४ कसोटींमध्येही तीच कामगिरी करत राहील.
Related
Articles
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
खराडी- शिवणे रस्त्यासाठी भूसंपादनाला वेग येणार
27 Jun 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघात ‘ब्लॅक बॉक्स’मधून डेटा मिळविण्यात यश
27 Jun 2025
हेडचे शानदार अर्धशतक
27 Jun 2025
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
खराडी- शिवणे रस्त्यासाठी भूसंपादनाला वेग येणार
27 Jun 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघात ‘ब्लॅक बॉक्स’मधून डेटा मिळविण्यात यश
27 Jun 2025
हेडचे शानदार अर्धशतक
27 Jun 2025
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
खराडी- शिवणे रस्त्यासाठी भूसंपादनाला वेग येणार
27 Jun 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघात ‘ब्लॅक बॉक्स’मधून डेटा मिळविण्यात यश
27 Jun 2025
हेडचे शानदार अर्धशतक
27 Jun 2025
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025
खराडी- शिवणे रस्त्यासाठी भूसंपादनाला वेग येणार
27 Jun 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघात ‘ब्लॅक बॉक्स’मधून डेटा मिळविण्यात यश
27 Jun 2025
हेडचे शानदार अर्धशतक
27 Jun 2025
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप