E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पाकिस्तानी तज्ज्ञाचा मोठा खुलासा
इस्लामाबाद
: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने ज्या नूर खान एअरबेसवर हल्ला केला त्यावेळी तेथे अमेरिकेच्या अण्वस्त्रांचा साठा होता, असा खळबळ जनक दावा पाकिस्तानचे सुप्रसिद्ध सुरक्षा तज्ज्ञ इम्तियाज गुल यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे असे अधोरेखीत होते, की अमेरिका आपली अण्वस्त्रे पाकिस्तानमध्ये ठेवते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नूर खानवरील हल्ल्यानंतरच अमेरिका सावध झाली आणि ट्रम्प यांनी भारताकडे युद्धबंदीची विनंती केली. या पाकिस्तानी तज्ज्ञाच्या दाव्यांवर प्रकाश टाकल्यास एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे काही वर्षांपूर्वी अमेरिकेनेच पाकिस्तानमध्ये एका गुप्त तळाबद्दल सांगितले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानविरुद्ध या गुप्त तळाचा वापर केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ट्रम्प यांनी दावा केला होता, की जर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवला नाही तर त्याचे रूपांतर अणुयुद्धात होऊ शकते. मात्र, भारताने हा दावा नाकारला आणि ट्रम्प यांच्या संघर्षबंदीच्या आवाहनाच्या दाव्याला स्पष्टपणे नकार दिला.
भारताने सरगोधाजवळील किराणा टेकड्यांवरही केला हल्ला
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील सरगोधाजवळील किराणा हिल्सवरही हल्ला केला. पाकिस्तान आपली अण्वस्त्रे सरगोधामध्ये ठेवतो हे देखील एक उघड गुपित आहे. पाकिस्तान हवाई दलाने त्यांच्या हवाई तळांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी निविदा जारी केल्या आहेत, ज्यामध्ये संगणक आणि आयटी संबंधित उपकरणे खरेदी करण्याचा उल्लेख देखील आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे अणु कमांड आणि नियंत्रण केंद्र नष्ट झाल्याच्या दाव्यांना यामुळे बळकटी मिळते. यानंतरच ट्रम्प यांनी भारतासोबत समेट करण्याबद्दल बोलणी सुरू केली.
पाकिस्तान देत होता अण्वस्त्रांची धमकी
पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचा दिखावा करत होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इतर नेते भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करण्याबद्दल बोलत होते; पण ९-१० मे रोजी जेव्हा भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्य करून नूर खान हवाई तळ आणि किराणा हिल्स उद्ध्वस्त केले, तेव्हा पाकिस्तानी राज्यकर्ते गुडघे टेकून ट्रम्पसमोर ओरडू लागले.
Related
Articles
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
संविधानच सर्वोच्च; मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार नाही
27 Jun 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणार
27 Jun 2025
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
संविधानच सर्वोच्च; मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार नाही
27 Jun 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणार
27 Jun 2025
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
संविधानच सर्वोच्च; मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार नाही
27 Jun 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणार
27 Jun 2025
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मंगळवारपासून बंद
29 Jun 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
संविधानच सर्वोच्च; मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार नाही
27 Jun 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणार
27 Jun 2025
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप