भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले   

मुनीर पुन्हा बरळले

कराची : भारताने ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानचे कंबरडे मोडले तरी देखील पाकिस्तानी सैन्याची युद्धाची खुमखुमी पुन्हा उफाळून येत असते. नुकतेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात वक्तव्य करत काश्मीरचा मुद्दा उकरुन काढला आहे.कराचीत नेव्हल अकॅडमीमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, भारताने दोन वेळा ’अकारण आक्रमण’ केल्याचा आरोप करत, भविष्यात भारताच्या कुठल्याही कृतीला ठोस व निर्णायक उत्तर देऊ असे मुनीर म्हणाले.
 
मुनीर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत भारतालाच दोषी ठरवले. त्यांनी दावा केला, की भारताने विनाकारण आक्रमण केले आणि त्यामागे दूरदृष्टीचा अभाव होता.भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईविषयी बोलताना असीम मुनीर म्हणाले, की पाकिस्तानने संयम दाखवत शांतता राखण्याचा प्रयत्न केला, आणि आम्ही प्रादेशिक स्थैर्यासाठी एक सकारात्मक भूमिका निभावत आहोत, असेही  मुनीर यांनी नमूद केले. 

दहशतवादाला ’न्याय्य संघर्ष’ ठरवण्याचा प्रयत्न

मुनीर यांनी आपल्या भाषणात, काश्मीरमधील हिंसक हालचालींना ’न्याय्य संघर्ष’ म्हणत अप्रत्यक्षपणे दहशतीला पाठिंबा दिला आहे. पाक लष्करप्रमुखाच्या अशा वक्तव्यांमुळे प्रादेशिक शांततेस धोका निर्माण होऊ शकतो. काश्मीरच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे.

काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील ताईत

दरम्यान, त्यांनी काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील ताईत आहे. त्यावर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी जनतेच्या आकांक्षेनुसार तोडगा निघावा, अशी मागणी मुनीर यांनी केली.
 

Related Articles