सोलापूर झेडपीला खूप वर्षानंतर लाभले पूर्णवेळ उपशिक्षणाधिकारी   

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात यापूर्वी वेतन अधीक्षक म्हणून काम पाहिलेले विठ्ठल ढेपे हे माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून गडचिरोली येथून बदलून येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सेवा ब गट मधील अधिकाऱ्यांच्या ३१ मे रोजी बदल्या केल्या होत्या. या बदल्यामध्ये ढेपे यांची गडचिरोलीला बदली झाली होती. आता पुन्हा सहा दिवसांतच शिक्षण विभागाने यात बदल करीत ढेपे यांची सोलापुरात नियुक्ती केली आहे. आठवडाभरात झालेल्या या चमत्काराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
मागील दोन ते तीन वर्षांपासून ढेपे हे शिक्षण विभागात वेतन अधीक्षक म्हणून काम पाहत होते. ते मूळचे बाळे येथील आहेत. यापूर्वी त्यांनी सोलापूर महापालिका शिक्षण मंडळात प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. 

Related Articles