पुणे : सुखसागर नगरच्या के एन के सोसायटीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या व्हॅगनार गाडीने एका मुलीला चिडले. श्रेया गौतम येवले (वय २१ ) असे या मुलीचे नाव आहे. अपघातात श्रेया गौतम येवलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शीतल हाईट्स, खंडोबा मंदिर कोंढवा जवळ ही घटना घडली. सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७) रा गोकुळ नगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
Fans
Followers