भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार   

सीमेवरील तीन देशांची होणार मदत

तेहरान : इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचा फटका सुमारे दहा हजारावर भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांची सुटका सुखरुप व्हावी, यसाठी भारताने केलेली विनंती इराणने मान्य केली आहे. त्या अंतर्गत सीमेवरील अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरुन विद्यार्थ्यांची सुटका करुन त्यांना भारतात पाठवण्यसाठी पावले उचलली आहे 
 
इ्रसालयचे  इराणवर  हवाई हल्ले सुरू आहेत. संघर्षामुळे इराणने दक्षतेचा उपाय म्हणून आपले हवाई क्षेत्र विमान उड्डाणाासाठी बंद केले आहे. त्यामुळे भारतासह अन्य देशांत विमानांची उड्डाणे बंद ्रझाली आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुटकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुटका जमिनीमार्गे करावी, अशी विनंती इराणला केली होती. ती इराणने मान्य केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची सुटका सीमावर्ती भागांतील देशांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी इराणच्या सीमेवरील अझरबैझान, तुर्केमेनिस्तान आणि अफगाणिस्तानची मदत घेतली जात आहे. या मार्गाने विद्यार्थ्यांना मायदेशी परत पाठवण्याची याजना इराणने आखली असल्याचे स्पष्ट होत आहे. 
 

Related Articles