ISI ची महिला भारतात उभारत होती हेरांचे नेटवर्क   

चंडीगड : भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना पाकिस्तानात येण्यास मदत करणारी आणि त्यांना हेरगिरीच्या जाळ्यात ओढणाऱ्या महिलेचा शोध लागला आहे. काही प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,' ती महिला पाकिस्तानी व्यावसायिक आहे. लाहोरमध्ये तिची ट्रॅव्हल एजन्सी आहे. ही महिला पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) साठी काम करते. नोशाबा शहजाद ही लाहोरमध्ये 'जैयाना ट्रॅव्हल अँड टूरिझम' नावाची कंपनी चालवते. ISI मध्ये तिला 'मॅडम एन' या नावाने ओळखले जाते. भारतात अटक केलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या चौकशीत तिचे नाव समोर आले. तिनेच काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या ज्योती मल्होत्रासह बऱ्याच इन्फ्लुएंसरना पाकिस्तानात बोलावले होते.

भारतात ५०० हेरांचे नेटवर्क तयार करण्याचा कट

'मॅडम एन'वर आरोप आहे की, ती भारतात कमीत कमी ५०० 'स्लीपर सेल' हेर तयार करण्याच्या योजनेत सामील होती. या हेरांना सामान्य नागरिकांप्रमाणे भारतात राहायचे होते आणि गुप्तपणे काम करायचे प्रशिक्षण दिले जात होते. सूत्रांनी पुढे सांगितले की, शहजादने भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची भेट पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांशी आणि ISIच्या लोकांशी करून दिली. विशेषतः भारतात राहणारे हिंदू आणि शीख लोकांना लक्ष्य करून पाकिस्तानात बोलावले जात होते. गेल्या सहा महिन्यांत तिने जवळपास 3,000 भारतीय नागरिक आणि 1,500 अनिवासी भारतीयांना (NRIs) पाकिस्तान भेटीसाठी मदत केली.

Related Articles