शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी   

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती शशांक हगवणेला न्यायालयाने १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खोटे कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणे याच्यावर वारजे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज दाखल करताना त्याने खोटे कागदपत्र दाखल केले आहेत. तसेच, बनावट भाडे करार देखील दाखल केले आहे. यात इतरांनी कुणी मदत केली आहे का? त्याचा तपास करायचा आहे. त्या पत्यावर अजून कुणी राहत होत का? शस्त्र परवाना मिळवला आहे, त्या शस्त्राने कुणाला धमकवला आहे का? याचा तपास करायचा आहे? या ठिकाणी राहून काही गुन्हे केले आहेत का? याचा देखील तपास करायचा आहे. याकरीता १३ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी तपास अधिकार्‍यांनी केली होती. सरकारी वकिलांच्या युक्तीवादात आरोपी शशांकने भाडे करारनामा कुठे बनविला आहे? परवाना मिळावा म्हणून अजून काही गुन्हे केले आहेत का? कागदपत्र दिले ते खरे आहेत का? याचा तपास करायचा आहे, असे नमूद करण्यात आले आहे. 

Related Articles